मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. एकीकडे भाजपकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांचे निलंबन रद्द करुन निश्चितच आम्हांला दिलासा दिला आहे. शेवटी सत्याचा विजय झाला. बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे सरकार सूड भावनेने करु पाहत होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द करुन सरकारला झटका दिला. इतकेच नाही तर अनेक गंभीर आक्षेप सुद्धा न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे’, असे दरेकर म्हणाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांचे निलंबन रद्द करुन निश्चितच आम्हांला दिलासा दिला आहे. शेवटी सत्याचा विजय झाला. बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम हे सरकार सूड भावनेने करु पाहत होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द करुन सरकारला झटका दिला.(1/2) pic.twitter.com/7MSbfx3DFS
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 28, 2022
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणीया १२ आमदारांचे (suspension of 12 BJP MLAs) ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते. या १२ आमदारांमध्ये आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, अतुल भातखळकर, संजय कुटे, योगेश सागर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भांगडिया यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
“ठाकरे सरकारचा थोबाड फोडून घेण्याचा विश्वविक्रम… गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही गेले”
“ड्राय डे ला किराणा दुकान आणि सुपर मार्केट बंद ठेवणार का?” बावनकुळेंचा ठाकरे सरकारला सवाल
“सत्याचा विजय झाला… ‘मविआ’ सरकारला न्यायालयाकडून झटका!”, प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
“महाभकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा ‘हा’ निर्णय”, भातखळकरांचे टीकास्त्र
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?”, ‘त्या’ निर्णयावरून चित्रा वाघ यांचा टोला


