🕒 1 min read
मुंबई : कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीबाबत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सध्या भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील यावरून केंद्र सरकारला झापलं आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी अनेक देश धावले आहेत. अनेक देशांमधून आरोग्य साहित्य भारताला मिळत आहे.
जगातल्या प्रत्येक मोठ्या वर्तमानपत्राने लाज काढली. रवांडा, नेपाळ आणि भूतान सारख्या देशांकडून मदत घ्यायची पाळी आली
सत्तर वर्षात जे कमावले ते काही वर्षात गमावले— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 11, 2021
यावरूनच राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. ‘जगातल्या प्रत्येक मोठ्या वर्तमानपत्राने लाज काढली. रवांडा, नेपाळ आणि भूतान सारख्या देशांकडून मदत घ्यायची पाळी आली सत्तर वर्षात जे कमावले ते काही वर्षात गमावले,’ असा प्रहार आव्हाड यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला समजलंय त्यांची लढाई राज्य सरकारविरोधात नाही – उद्धव ठाकरे
- …म्हणून मला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम केलं जातंय; देशमुखांचा गंभीर आरोप
- ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार – अजित पवार
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- औरंगाबादसह राज्यात एफसीआयचे दोन विभागीय कार्यालये, केंद्रीय मंत्री दानवे यांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

