🕒 1 min read
औरंगाबाद : देशात एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाची महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित केली जात आहे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंबंधीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रात एफसीआयची आणखी दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि अमरावती येथे तातडीने कार्यान्वित होत आहेत. ही कार्यालये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ क्षेत्रांसाठी सेवा पुरविणार असल्याचे दानवे यांनी सागितले.
यावेळी दानवे म्हणाले, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभार्थी, समाजसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहक याना मोठा लाभ मिळेल. ही कार्यालये सुरु झाल्यामुळे, कार्यक्षमपणे व जलदगतीने कामे होण्यासाठी एफसीआयच्या संबंधित विभागीय कार्यालयांशी संपर्क साधणे सोयीस्कर होणार आहे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्वांना अन्नसुरक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करण्याच्या दृष्टीने एफसीआय ही एक विश्वासार्ह संस्था म्हणूनही गणली जाते.
To ease the functioning of Marathwada and western Vidarbha, @Fci_maharashtra is going to start two more offices at Aurangabad and Amravati shortly. @raosahebdanve @FCI_India @PIBMumbai @DDKisanChannel @DDNewslive @AkashvaniAIR @airnewsalerts pic.twitter.com/XF5JOrpAMa
— FCI_Maharashtra (@Fci_maharashtra) May 10, 2021
महाराष्ट्रात सहा एफसीआय : गोव्यासह महाराष्ट्र राज्यात सहा विभागीय कार्यालयांमार्फत एफसीआयचे काम चालत असे. सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या रचनेमध्ये- मुंबई आणि उपनगरीय क्षेत्राला सेवा देणारे बोरीवली येथील विभागीय कार्यालय, रायगडला सेवा पुरविणारे पनवेल विभागीय कार्यालय, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण पट्ट्याला सेवा पुरविणारे पुणे विभागीय कार्यालय, संपूर्ण विदर्भाला सेवा पुरविणारे नागपूर येथील विभागीय कार्यालय आणि नाशिक, खान्देश व मराठवाड्याच्या बहुतांश भागाला सेवा देणारे मनमाड विभागीय कार्यालय यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?
- व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून खा.जलील आणि भाजप आ.सावेंमध्ये खडाजंगी
- दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली महिती
- राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ;मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

