🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला रविवारी दुपारी मुंबईतील वांद्रे येथील निवासी सोसायटीच्या गेटवर कार घुसवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांबळीने घटनेनंतर कॉम्प्लेक्सच्या चौकीदार आणि काही रहिवाशांशी वाद घातला होता, त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.
“त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. ते म्हणतात, विनोद एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, विनोद असे बघून खूप वाईट वाटतेय, माझ्यासारखे अनेक जण तुझ्या वर प्रेम करतात, हे बघून डोळ्यात पाणी येते.”
रहिवाशाशी वाद घातल्या प्रकरणी आणि गेटवर गाडी आदळण्याप्रकरणी कांबळी यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ३३६ (इतरांचा जीव धोक्यात घालणे किंवा वैयक्तिक सुरक्षितता) आणि ४२७ (दुर्घटनामुळे नुकसान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
विनोद एक उत्कृष्ट क्रिकेट पटू …. विनोद असे बघून खूप वाईट वाटते … माझ्यासारखे अनेक जण तुझ्या वर प्रेम करतात … डोळ्यात पाणी येते … https://t.co/YCcTZlRCSM
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 3, 2022
विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांबळी सायबर फ्रॉडचा बळी ठरला होता. एका फसवणूककर्त्याने फोनवर एका खाजगी बँकेच्या एक्झिक्युटिव्हची तोतयागिरी केली आणि आपले नो युअर कस्टमर (केवायसी) तपशील अपडेट करण्याच्या बहाण्याने त्याच्या खात्यातून १. १४ लाख रुपये काढले. कांबळीने वांद्रे पोलिसात जाऊन तक्रार नोंदवल्यानंतर ही घटना ३ डिसेंबर रोजी उघडकीस आली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
