Share

‘मी वक्तव्य बदलणारा माणूस नाही’; जितेंद्र आव्हाड ओबीसी विधानावर ठाम

Published On: 

पुणे: राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ओबीसी समाजावर वक्तव्य केलं होतं. ओबीसींवर माझा विश्वास नाही, असं विधान केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने जोरदार निर्दशनं केली होती. त्यानंतर आज पुण्यात राज्यस्तरीय वंजारी समाजाच्या मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी बोलत असताना आव्हाड यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, सध्याचं राजकारण हे घाणेरडं झालं आहे. काहीही झालं तरी माझ्या घरावर मोर्चे काढतात. माझी मुलगी घाबरते. यापूर्वी ही राजकारण झालं गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष सगळ्यांनी पहिला मात्र आताची ज्या परिस्थित राजकारण केलं जातं ते घाणेरडं आहे, अशी टीकाही आव्हाड यांनी भाजपवर केली आहे.

ओबीसीवर (OBC) केलेल्या वक्तव्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम आहे, मी माझं वक्तव्य बदलणारा माणूस नाही, मी जे बोलतो ते माझ्या ह्रदयापासून असते, पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाही’ असं म्हणत आव्हाड यांनी ओबीसी विधानावर आपण ठाम असल्याचे स्पष्टपणे सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!