औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. यात विशेषतः विदेशातून येणाऱ्या तसेच मुंबई, पुणे या ठिकाणाहून येणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र शहरातील बस स्थानकांवर अजूनही कोरोना तपासणी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे बस स्थानके पुन्हा एकदा कोरोना स्प्रेडर ठरू शकतात.
शहरात सलग तीन दिवस शंभरपेक्षा अधिक रुग्ण निघत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर विमानतळ आणि रेल्वे स्थानक या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. यामध्ये विशेषतः मुंबई पुणे तसेच विदेशातून येणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. विदेशातून शहरात आलेले दोन जण ओमायक्रोन पॉझिटिव्ह देखील निघाले होते.
त्यानंतर विमानतळावरील चाचण्यांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यावेळी बसस्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जात होती. याठिकाणीही रुग्ण आढळून येत होते. मात्र यंदा ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तसेच दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर अजूनही शहरातील दोन्ही एसटी स्थानकांवर तपासण्या सुरु करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याने येणाऱ्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास नवल वाटायला नको.
पुण्याला जाणारे प्रवासी घटले
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरीही औरंगाबादहून गेल्या दोन महिन्यात शिवशाहीतून अनेक प्रवासी पुण्याला प्रवास करत होते. मात्र गेल्या ८ दिवसात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये कमालीची घट झाली आहे. ६ जानेवारी रोजी ५५ प्रवासी पुण्याला गेले तर शुक्रवारी ७ जानेवारी रोजी २४ प्रवाशांनी पुण्याला प्रवास केला.
महानगरपालिकेच्या सूचनेनंतरच एसटी स्थानकावर तपासण्या
गेल्या चार ते पाच दिवसात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या निश्चितच कमी झाली आहे. या पाठीमागे कोरोना हेच कारण आहे. मात्र अजून पर्यंत आपण स्थानकावर कोरोना तपासण्या सुरु केलेल्या नाही. कारण याआधीही जोपर्यंत महानगरपालिका सूचना करत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचे पथक बस स्थानकावरील तपासण्या करत नाही तोपर्यंत एसटी महामंडळ कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार या तपासण्या केल्या जात असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- गुगलकडून देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिकेला अभिवादन; जाणून घ्या कोण होत्या फातिमा शेख
- “किरीट सोमय्या हळूच कुठलीतरी गोळी खातात, ती फस्ट्रेशनची आहे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- सावधान! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ आलाय
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

