जालना : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच आता पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत.हे निर्बध रविवारी (ता.९) रात्रीपासून लागू होणार आहेत.
या संदर्भात आज(९ जाने.)आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना टोपे म्हणाले की,’बार आणि दारूच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर ते ही बंद करावी लागतील.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’सध्या राज्यात रोज ४० हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल तेथे निर्बंध लावले जातील. सध्या राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, असेही टोपे म्हणाले.
दरम्यान, ज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येणार आहे. असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहिर केले आहे. यावर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’शाळा बंद आणि बार सुरू, या महाभकास आघाडीला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्वाचा. म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला “क्लास पेक्षा ग्लास” महत्त्वाचा वाटतो. वाह रे वाह ठाकरे सरकार’, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…
- सिंधुताईंची अपूर्ण इच्छा होणार पुर्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
- सावधान! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ आलाय
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

