औरंगाबाद: रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २ जानेवारीला जालना येथे एका कार्यक्रमात पिटलाईन जालना येथे होईल अशी घोषणा केली होती. त्यातच आता पुन्हा खा. डॉ. फौजिया खान यांनी रेल्वे मंत्रालयास लिहिलेल्या पत्राला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी औरंगाबादेतील पिटलाईनला मंजुरी दिली आहे. अवघ्या ६ दिवसांत औरंगाबादची पीटलाइन जालन्याला नेलेली दिसत आहे. तसेच रावसाहेब दानवे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. असा आरोप खा. फौजिया खान यांनी केल्याने आता पुन्हा पिटलाईन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. डाॅ. फौजिया खान यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, सध्या औरंगाबाद आणि लातूर येथे पिट लाइनची आवश्यकता नाही. नांदेड आणि पूर्णा येथे उपलब्ध असलेल्या कोच देखभाल सुविधा जवळपासच्या क्षेत्राची सध्याची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहेत. पिट लाईनची भविष्यातील गरज लक्षात घेऊन भविष्यातील गरज लक्षात घेतली तर औरंगाबादपासून १० कि.मी. अंतरावरील चिकलठाण्यात पीटलाइन निर्मितीच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे.
फौजिया खान यांनी शुक्रवारी हे पत्र ट्विट केले आहे. त्यामुळे पिटलाईन कुठे होणार? की नुसताच यावर वाद सुरू आहे. पिटलाईन औरंगाबादलाच व्हावी अशीही मागणी केली जात आहे. औरंगाबाद मध्ये पिटलाईन होण्याची आवश्यकता आहे. राज्यमंत्री आपल्या गावाला पिटलाईन कसे घेऊन जाता? असा संतप्त प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही उपस्थित करत औरंगाबादलाच पिटलाईन व्हावी. अशी मागणी केली आहे.
खासदार फौजिया खान म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वेच्या बैठकीत औरंगाबाद, लातूरमध्ये पिटलाईन उभारावी असे पत्र केंद्रीय मंत्र्यांना दिले होते. लातूरची मागणी मान्य झाली नाही. मात्र औरंगाबादची मागणी मान्य झाल्याचे लेखी पत्र आपल्याला मिळाल्याचे खान म्हणाल्या. तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय अंतिम समजला जातो असेही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- गुगलकडून देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिकेला अभिवादन; जाणून घ्या कोण होत्या फातिमा शेख
- “किरीट सोमय्या हळूच कुठलीतरी गोळी खातात, ती फस्ट्रेशनची आहे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- सावधान! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ आलाय
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान


