Share

जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; जाणून घ्या सुधारित निर्बंध

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचे रुग्ण देखील वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यात लाकडाऊन लागेल का?,असा प्रश्न सर्वांना पडला होता. याबाबत राज्य पातळीवर अनेक बैठका सुद्धा सुरु होत्या. दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून रात्री ११ ते सकाळी ५ हा नाईट कर्फ्यू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आज(९ जाने.)मध्यरात्रीपासून हे नियम लागू होती. तसेच यामध्ये केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, परंतु ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर आता सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

आपल्या सुधारित आदेशात राज्य सरकारने म्हंटले आहे की, ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. तसेच ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. जिम देखील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच जिममध्ये प्रवेश असणार आहे.

काय सुरु काय बंद?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!