Share

पूर्वी ‘चिडी’चा डाव खेळायचे, आता ‘ईडी’चा डाव खेळतात : जितेंद्र आव्हाड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्षवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे नेते आ.जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

पूर्वी काही येत नसेल तर ‘चिडी’ चा डाव खेळायचे, आता मात्र ‘ईडी’चा डाव खेळतात. अशी खोचक टीका आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून केली आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाच्या चौकाश्यांचे सत्र चालू आहे. त्यामुळे अनेक नेते आपले घोटाळे झाकण्यासाठी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याच दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ईडी आणि आयकर विभाग हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची टीका केली जात आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षात मोठी पडझड झाली आहे. तर अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकी पूर्वीचं राज्यातील अनेक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, नवी मुंबईचे संदीप नाईक, चित्रा वाघ, वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरकरून पक्षाला धोका दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तिवरे धरणाच्या दुर्घटनेचाही तावडेंनी ‘विनोद’ केला – जितेंद्र आव्हाड

‘या’ बड्या नेत्याची शिवसेनेत घरवापसी, छगन भुजबळांची चिंता वाढली

जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असेल, तर मतपत्रिकेवर मतदान घेण्यास हरकत काय?

करावं तस भरावं,पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले आज राष्ट्रवादी त्यांच्याच डोळ्यादेखत फुटतीये – सदाभाऊ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!