Share

जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असेल, तर मतपत्रिकेवर मतदान घेण्यास हरकत काय?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात येत्या २१ तारखेला मुंबईत मोर्चा काढून सर्वसामान्य जनतेकडून ईव्हीएमविरोधात अर्ज भरून घेतले जाणार असल्याचं, विरोधी पक्षांकडून सांगण्यात आलं आहे. आज मुंबईत सर्व विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत, ही माहिती दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

ईव्हीएममुळे शंकेला वाव राहतो, यामुळे विधानसभा निवडणुकामतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात, अशी मागणी या पक्षांनी केली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असेल, तर मतपत्रिकेवर मतदान घेण्यास हरकत काय, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ईव्हीएमवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

अनेक मान्यवरांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केलेली आहे. त्यामुळे यावेळी निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी मागणी यावेळी पवार यांनी केली .इंदिरा गांधींनाही त्यावेळी जनतेनं निवडून दिलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यास प्राधान्य द्यावं. माझ्या कुटुंबात सात मतं होती, फक्त पाचच पडली, अशीही शक्यता काहींनी व्यक्त केली होती. ही जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी, जनतेनं प्रतिसाद दिल्यास निवडणूक आयोग वेगळा विचार करू शकतो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

‘शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करा’

‘सोडून जाणाऱ्या नेत्यांमुळे पवारांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील’ : जितेंद्र आव्हाड

‘या’ कारणामुळे नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता

‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!