Share

पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन लागणारच – जितेंद्र आव्हाड

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज बोलवण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला गेला आहे.

या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबतची नियमावली लवकरच सरकार जाहीर करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. तर उद्या रात्री ८ वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे.

दरम्यान, आजच लॉकडाऊन लावावा यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांवर सर्वच मंत्र्यांनी दबाव टाकल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ‘आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांनी दबावच टाकला. लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घ्या असा दबाव टाकला. गेल्या वेळी लॉकडाऊन उघडा, असं काही मंत्रीच म्हणायचे. पण सगळं आता आऊट ऑफ कंट्रोल जातंय. पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीयत. म्हणजे लागणारच नाही. ज्याला हृदय आहे त्याला या चिता बघून झोप लागणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन करावं, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आता याबाबत काय नियम आणायचे त्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. लोकं घराच्या बाहेर पडले नाही पाहिजेत. यासाठी जे करता येईल ते करावं लागेल’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!