Share

सोन्याची वाटचाल पुन्हा ५० हजाराच्या दिशेने!

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात येत आहे. भारतीय ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार २० एप्रिल रोजी सराफा बाजारात सोने ४७ हजार १७४ रुपये प्रती १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदीच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली असून चांदी ६८ हजार ६०८ रुपये प्रती किलोग्रॅमवर पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मते डिसेंबरपर्यंत सोने पुन्हा एकदा ५० हजारांच्यावर जाण्याची शक्यता आहे.

देशात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सोने पुढील दोन किंवा ३ महिन्यात ५० हजारांच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. स्थितीत सुधारणा झाली नाही तर, सोन्याच्या किमती आणखी वाढतील. कोरोनामुळे जगभरातील बाजारात अनिश्चित वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवण्यात येते. त्यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदी करण्यावर भर देतात. मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किंमती देखील वाढतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिल्यास चीन मध्ये सर्वाधिक सोन्याची खरेदी केली जाते. त्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. भारतात दरवर्षी सुमारे ७०० ते ८०० टन सोन्याची मागणी असते. गेल्या वर्षीची तुलना केल्यास या वर्षी सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे या वर्षी सोने आयातीमध्ये ४७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानच्या तिमाहीमध्ये देशात ३२१ टन सोन्याची आयात झाली आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत देशात १२४ टन सोने आयात झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!