औरंगाबाद : महाराष्ट्रात असलेले सर्व धार्मिक स्थळांचे हाॅल तसेच दान पेटीत जमा झालेला पैसा हा कोराना महामारी रोगासाठी वापरावा. जेणेकरून गरीब जनतेला महाराष्ट्र सरकारचा आधार मिळेल तसेच धार्मिक स्थळांच्या हाॅलमध्ये बेड टाकुन हाॅस्पीटल तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे जागेचे भाडे वाचेल आणि खासगी रूग्णालयाला दिला जाणारा भाड्याचा पैसा पण वाचेल. याठिकाणी सरकारी दराने सर्व उपचार करावे. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विद्यार्थी आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
कोरोना झालेल्या रूग्णाला हाॅस्पीटलमध्ये बेड मिळणेही खुप जास्त कठीण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळाच्या दान पेटीत जमा झालेला पैसा हा गरीबांच्या पुनर्वसनासाठी वापरावा. महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांच्या हाॅलमध्ये बेडची व्यवस्था करून हाॅस्पीटल म्हणुन त्यांचा उपयोग करावा. तसेच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळाच्या दानपेटीत जमा झालेला पैसा हा कोरोनामध्ये मरण पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वापरावा.
कोरोना आजाराच्या रूग्णांसाठी या पैशाचा उपयोग करावा, रेमडेसिवीरचा काळाबाजार करणा-यांवरती कठोर कारवाई करावी, खासगी रूग्णालयाकडून होत असलेली पैशांची लुट यासंदर्भात सर्व जिल्हयातील खासगी हाॅस्पीटलचा अहवाल मागवुन दोषी असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रेमडेसीवीर इंजेक्शनचे शासनाने ठरवुन दिलेले दरपत्रक प्रसिद्ध करावे. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तन्मय प्रकरणी अमृता फडणवीस मैदानात, म्हणाल्या..
- प्रकाश पर्वानिमीत्त केंद्र सरकारकडे केली १०० कोटी रुपये द्या ; नांदेड गुरुव्दाराच्या अध्यक्षांची मागणी
- मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- ‘साहेब, कोंबड्या अंडी देत नाहीत’; पोल्ट्री चालकाची पोलिसांत तक्रार
- भारतीय नौदलाची धडक कारवाई, तब्बल 3000 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ केले जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

