🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. स्वबळाच्या नाऱ्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच टोलेबाजी सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीतील तणाव वाढत असतानाच नाना पटोले यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावरती काँग्रेस पक्षामध्ये देखील नाराज असल्याची बातमी आता समोर येत आहे. पक्षातील काही नेते आणि आमदार नाराज असल्याची माहिती आहे आहे. निवडणुकीला आणखी वेळ असल्यामुळे आत्ताच स्वबळाची भाषा योग्य नसल्याचे मत काही नेते आणि आमदार खाजगीत व्यक्त करत आहेत. दुसरीकडे पटोले यांच्या घोषणेनंतर सेना आणि राष्ट्रवादीत देखील नाराजी आहे. खुद्द मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील नाराज आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सामन्यानंतर दिसली विल्यमसन आणि कोहलीची मैत्री ; सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल
- युपीत रंगणार योगी विरुद्ध प्रियांका असा सामना; कॉंग्रेसपुढे असणार आव्हानांचा डोंगर
- ‘काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल’
- ‘ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?’ रोहिणी खडसेंचा थेट सवाल
- मोठी बातमी! नाराज जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
