औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या बाजूने औरंगाबाद जिल्ह्यातील 866 ग्रामपंचायतमध्ये ठराव घेणार असल्याची माहिती झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर पाटील यांनी दिली. शिवजयंतीपासून मराठा आरक्षण ठराव अभियान घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील एमजीएम येथे एका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तोडगा काढण्याचे ठरवले तर एका रात्रीत सत्ता आणणारे नेते नक्कीच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करू शकतात. परंतु तसे होताना दिसत नाही. यावर सर्व राजकीय पक्षांना या मुद्याचे राजकारण करायचे आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शिवजयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची बैठक घेवून ग्रामसभेमध्ये मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे ठराव घेण्याची विनंती देखील या अभियानातून करण्यात येणार आहे. या अभियानातील प्राप्त ग्रामपंचायतीतील ठराव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे. तसेच 8 ते 18 मार्च दरम्यान सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणबाबतची याचिकेवर सुनावणी होणार आहे.
यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर, केंद्रीय कार्याध्यक्ष नीलेश डवले, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल माने, अनिल गरड, संतोष काळे, नितीन पाटील, नंदू गरड, अरुण नवले, किरण खरात आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- डिलिव्हरीच्या वेळेपर्यंत काम करणाऱ्या महापौरांवर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- पडळकरांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा दावा गृहमंत्र्यांनी फेटाळला !
- ममता बॅनर्जींबाबत अमित शाह यांनी केलेलं ‘ते’ भाकीत खरं ठरणार ?
- ‘अक्कल गहाण ठेवलेला किंवा नशा करणारा माणूसच मोदींना डरपोक बोलू शकतो’

