मुंबई : भारतावर कुरघोडी करणं ही चिनी ड्रॅगनची जुनीच सवय आहे. गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीन मध्ये संघर्ष वाढला होता. कोरोना काळात देखील चीनने भारतीय भूभागात घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यावेळी दोन्ही देशाचे सैन्य एकमेकाला भिडलं देखील होतं. यात भारताचे २० जवान शहिद झाले होते. तर, याहून दुप्पट चिनी सैनिकांना भारतीय फौजेने यमसदनी धाडलं होतं.
दोन्ही देशाच्या सैन्यांमध्ये तब्बल आठ चर्चेचा फेऱ्या झाल्या. तर, नवव्या फेरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यानुसार भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे घेतली आहे. याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील राज्यसभेत माहिती दिली आहे.
दरम्यान, भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर प्रहार केला आहे. चिनी सैन्य डेपसांगमधून का मागे हटत नाही हा मुद्दा राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे. मोदींनी भारतीय जमीन चीनकडे का दिली ? असा सवाल देखील त्यांनी केला.
‘देशाच्या पंतप्रधानांनी भारताची पवित्र भूमी चीनच्या स्वाधीन केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनपुढे गुडघे टेकले आहेत. मोदी चीनला घाबरत आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. चीनसमोर नरेंद्र मोदींनी आपलं शीर झुकवलं, माथा टेकला. आपली जमीन फिंगर ४ पर्यंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्याड आहेत जे चीनसमोर उभे राहू शकले नाहीत. हेच सत्य आहे. ते सेनेच्या बलिदानावर थुंकत आहेत, हेच ते सांगत आहेत. त्यांनी सेनेच्या त्यागाचा अपमान केलाय.’ असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधींच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. डरपोक तुमचे पणाजोबा नेहरू होते ज्यांनी हजारो चौरस मैलाचा भारताचा अक्साई भूभाग चीनला आंदण दिला. UPA च्या काळात याची पुनरावृत्ती झाली. अक्कल गहाण ठेवलेला किंवा कोकेनसारखी नशा करणारा माणूसच मोदीजींना डरपोक बोलू शकतो…’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
डरपोक तुमचे पणाजो नेहरू होते ज्यांनी हजारो चौरस मैलाचा भारताचा अक्साई भूभाग चीनला आंदण दिला. UPA च्या काळात याची पुनरावृत्ती झाली.
अक्कल गहाण ठेवलेला किंवा कोकेनसारखी नशा करणारा माणूसच मोदीजींना डरपोक बोलू शकतो … pic.twitter.com/IadZBfDGat— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 12, 2021
महत्वाच्या बातम्या
- डिलिव्हरीच्या वेळेपर्यंत काम करणाऱ्या महापौरांवर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- पडळकरांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा दावा गृहमंत्र्यांनी फेटाळला !
- ममता बॅनर्जींबाबत अमित शाह यांनी केलेलं ‘ते’ भाकीत खरं ठरणार ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

