Share

डिलिव्हरीच्या वेळेपर्यंत काम करणाऱ्या महापौरांवर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव

Published On: 

जयपूर : एरवी राजकारण्यांना दूषणे देण्यात धन्यता मानली जाते, परंतु काही असेही असतात जे आपल्या कर्तबगारीने कौतुकास पात्र ठरतात. जयपूरच्या महापौरांनीही असाच एक आदर्श ठेवला आहे. जयपूरच्या महापौर डॉ. सौम्या गुर्जर यांनी डिलिव्हरीच्या वेळेपूर्वी काही तासआधीपर्यंत पालिकेचे कामकाज केले, प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी रुग्णालय गाठून एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

कर्म हीच पूजा मानणाऱ्या महापौर सौम्या गुर्जर यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जयपूरच्या महापौरांनी राजकारण्यांसमोर एक आदर्श ठेवल्याचे यानिमित्त बोलले जात आहे. जयपूर महानगरपालिकेच्या महापौर डॉ. सौम्या गुर्जर गुरुवारी प्रसूतीपूर्वी काही तासांपर्यंत काम करत होत्या. गुरुवारी पहाटे 5.14 वाजता मुलाला जन्म देण्यापूर्वी त्यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत काम केले.

गुरुवारी सकाळी एका ट्विटमध्ये स्वत: सौम्या म्हणाल्या, “कर्म ही पूजा!  रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बैठक घेतली. प्रसूतिवेदना सुरू झाल्यावर रात्री साडेबारा वाजता कुकून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पहाटे 5.14 वाजता देवाच्या कृपेने मुलाला जन्म दिला. मी आणि बाळ दोघे चांगले आहेत.” डॉ. सौम्या यांच्या पोस्टवर आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लाईक्स आणि कॉमेंट्स आल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!