मुंबई : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे १६ वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
मात्र, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली.
पण पडळकर यांना हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात. अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण प्रकरणी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत भाष्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे.
‘काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा आ.गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करत आहेत. उद्या रीतसर दि. १३/०२/२०२१ रोजी दु. ४:३० वा. आदरणीय पवार साहेबांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे’, अशी माहिती अनिल देशमुख यांनी ट्वीट करून दिली.
महत्वाच्या बातम्या
- जपान ऑलिंपिक साठी सज्ज भारतात पात्र खेळाडूंचे लसीकरण कधी ?
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- आजपासून 2000 रुपयांचं डिस्काऊंटसह खरेदी करा रीअलमीचा ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

