Share

 ममता बॅनर्जींबाबत अमित शाह यांनी केलेलं ‘ते’ भाकीत खरं ठरणार ?

Published On: 

नवी दिल्ली- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व आमदरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. तर, डाव्या पक्षांनी काँग्रेसला सोबत घेत ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर राज्यातील आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

बंगालमध्ये ममता यांच्या तृणमूलला गळती लागली असून, अनेक जण पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत.पश्चिम बंगालमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी,आमदार अरिंदम भट्टाचार्य,सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान,माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांनीही राजीनामा दिला आहे.लक्ष्मी रतन शुक्ला ममता सरकारमध्ये क्रिडा मंत्री होते, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी ते तृणमुल काँग्रेसचे आमदार आहे.याशिवाय राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष या पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांचे राजीनामा सत्र अजूनही सुरूच आहे.राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असतानाच नाट्यमय घडामोड घडली असून तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने राजीनामा दिला आहे. टीएमसीचे राज्यसभेतील खासदार दिनेश त्रिवेदी यांनीदेखील पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्याची घोषणा त्यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. आज माझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे. मी आज राज्यसभेतून राजीनामा देत आहे असे ते म्हणाले.माझ्या राज्यातील हिंसाचाराबाबत मी काहीही करु शकत नाही, त्यामुळे मला गुदमरल्यासारखे होते. माझं मन मला सांगत आहे, की जर तू इथे बसून काही करु शकत नाही, तर तू राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे मी राजीनामा देतो आहे. मी पश्चिम बंगालच्या लोकांसाठी काम करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,सुवेंदू अधिकारी यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हा गृहमंत्री अमित शाह यांनी एक भाकीत केले होते. त्यावेळी अमित शाह म्हणाले होते कि,आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल असं भाकीत शाह यांनी केले होते.

आता हे भाकीत खरे ठरतेय की काय अशी चर्चा सुरु आहे मात्र ममता यांनी यापूर्वी देखील अश्या संकटाचा सामना केला असल्याने त्या देखील पलटवार करणार असे काहींचे म्हणणे आहे. ममता यांचा पिंडच मुळात झुंजार आहे त्यामुळे त्या सहजासहजी हार पत्करतील असे नाही.भाजप आपले संघटन बंगालमध्ये मजबूत करत करत असला तरीही भाजपला बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!