टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्याच्या जन आशीर्वाद यात्रेवर आहेत.
या यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे बीडमध्ये आले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी नव महाराष्ट्र घडविण्याचा दृष्टीकोन समोर ठेऊन विकास कामे केली जात आहेत. शिवसेनेत जयदत्त क्षीरसागरांवर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी दिली आहे. जे नेते सक्षमपणे काम करु शकतील अशाच स्किलबेस्ड नेत्यांची शिवसेनेत भरती केली जात असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले असे सांगून कुशल नगराध्यक्षांच्या दिर्घकालीन संकल्पनांची कामे बीडमध्ये होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी सोलपूरमध्ये एक बस सुरु करण्यात आली आहे. राजकारणाचा वापर हा समाजकारणासाठी केला जात आहे. जनयात्रा ही केवळ सर्व सामान्यांच्या समस्या ऐकण्यासाठी काढली आहे. ही यात्रा माझ्यासाठी तीर्थ यात्राच आहे. असंही आदित्य ठाकरे म्हनाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या कामांचे कौतुक केले. बीड नगर पालिकेने पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करत भुमिगत गटार योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यांचे काम हे पुढील पन्नास वर्षाच्या दृष्टीकोनातून सुरु असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच सेनेमध्ये स्किलबेस्ड नेत्यांची भरती केली जात असल्याचे सांगत एक प्रकारे क्षीरसागर बंधूंच्या कामाची पावतीच दिली.
काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याने स्वीकारले मुख्यमंत्र्यांचे चॅलेंज
बाजारबुणग्यांचे ठरायच्या अगोदर माझं ठरलंय अन हनीमुन पण झालाय – जयकुमार गोरे
‘खासदारकीचा तुकडा मिळण्यासाठी राजू शेट्टींनी अभद्र युती केली’
राज ठाकरे यांनी पक्षवाढीवर लक्ष केंद्रीत करावे, रामदास आठवलेंचा प्रेमाचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

