टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे . सर्वच राजकीय पक्षांनी आता वेगवेगळ्या मार्गांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दरम्यान राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारले आहे.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील सभेत विरोधकांना त्यांनी काय काम केलं आणि सरकारने काय काम केलं हे सांगण्याचं आव्हान दिलं होतं.मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आव्हानावर पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री यांचं वादविवादाचं आव्हान मी घेतो. मी मुख्यमंत्री यांच्यासमोर वादविवाद करायला तयार आहे. ते महाजनादेश यात्रेसाठी जेथे जेथे मेळावे घेतील, तेथे तेथे आम्ही पर्दाफाश मेळावे घेऊ अस विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी या राज्याचा दुप्पट विकास केल्याचा दावा केला. मात्र, असं काहीही नसून खरंतर राज्यावर कर्जाच्या बोजात दुप्पट वाढ झाली आहे. मुख्यमंत्री संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमी मोझरी येथे येऊन खोटं बोलले. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने ‘फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’ घेऊ. तसेच मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानिशी जनतेसमोर मांडू असंही पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, २०१४ च्या निवडणूकीत पटोले हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु १०१९ ला त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेस मध्ये प्रेवेश करत नागपुर मधून निवडणूक लढवली होती. नागपूर मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा पराभव केला होता.


