मुंबई : कर्नाटक राज्यातील उडपी येथे काही शाळेत शिकणाऱ्या मुली धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू पाहत होत्या,परंतु उडपी मधील त्या शाळेच्या प्राचार्यांनी त्या मुलींना धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू दिला नव्हता.
यावरून देशभर मोठ्या प्रमाणात वादंग उठला आहे. ज्या मुस्लिम मुली धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू इच्छित होत्या त्यांना प्रतिक्रिया म्हणून कित्येक हिंदू मुला मुलींनी अंगावर भगवी शाल परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केला होता आणि आंदोलन पण केले होते. या हिंदू मुस्लिम शालेय,महाविद्यालयीन तरुणांच्या वादावर देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी आणि लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यातच आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, ” प्रत्येकाने कोणता वेश परिधान करायचा याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. याबाबत व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कोणाकडूनही हिरावून घेतला जाऊ शकत नाही. शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण जे पूर्वीपासून चालू आहे त्यामध्ये व्यत्यय आणून वेगळी भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या कर्नाटकात होत आहे. त्या शाळेत पूर्वी ते चालू होते पण ते आता थांबण्यासाठी मुद्दाम हा विषय तयार करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारच्या अपयशांकडून लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न आहे असेही ते प्रतिक्रिया देताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- रामदास आठवलेंनी काढल्या शशी थरुरांच्या इंग्रजीतील Spelling Mistakes
- अजित पवार आणि आदित्य ठाकरेंकडून मुंबईत विकास कामांची पाहणी
- “आईने खूप करुणा दिली, त्यामुळे मला कोरोना होणार नाही”, राज्यपालांचा दावा
- शिवसेनेचे २०१७ साली ‘करून दाखवलं’ आणि आता २०२२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नवीन घोषवाक्य
- Goa Assembly Election 2022 : “..तर भाजपला ४० पैकी ४२ जागा मिळू देत”, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याला राऊतांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

