Share

गृह विभागामुळं जयंत पाटलांचा बीपी वाढतो, म्हणून त्यांनी गृहखातं नाकारलं- अजित पवार

Published On: 

पुणे : अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटलांना गृहमंत्री पद घ्या असं मी म्हणालो होतो. पण ते म्हणाले नको गृह विभागामुळं माझा बीपी वाढतो. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांकडे ते खातं गेलं. पण तुमचं तसं होऊ नये उलट तुमच्या सर्व व्याधी या गृह विभागामुळं जावोत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.

अर्थात हे म्हणताना त्यांचा सूर मिश्किलपणाचा होता, म्हणूनच त्यांनी पत्रकारांना हे ऑफ दि रेकॉर्ड आहे असं सूचित केलं. नाहीतर तुम्ही ब्रेकिंग न्यूज कराल आणि जयंतराव म्हणतील अजित तू काहीही सांगत बसतो, असं म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘दिलीप वळसे पाटलांकडे आज गृहमंत्री पद आहे. फार बारकाईने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. कायदा सुव्यवस्था कशी योग्य राहील. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. मागे आर आर आबा, छगन भुजबळ मग जयंत पाटील यांनी एक वर्ष गृहमंत्री पद सांभाळलं’, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

मी यावेळी जयंतरावांना म्हटलं की तुम्ही एकच वर्ष गृहमंत्री पदी होता, आता यावेळी परत घ्या ना. पण जयंत राव म्हणाले, नाही… ते म्हणाले गृहखाते घेतल्यावर माझा बीपी वाढेल. मला गोळ्या सुरू झाल्या. मला नको गृह विभाग. लगेच पत्रकार ब्रेकिंग चालवतील, नाहीतर जयंत राव म्हणतील अजित तू काहीही माझं सांगत बसतो. दिलीपराव तसं आपलं काही होऊ नये. उलट आपल्याला ज्या काही व्याधी असतील त्या गृहखातं मिळालं म्हणून त्या सर्व व्याधी दूर व्हावं अन् तुम्ही एकदम ठणठणीत व्हा, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!