Share

कोरोना कसा घालवायचा यावर मुख्यमंत्र्यांनी WHOला मार्गदर्शन केलंय म्हणे- चित्रा वाघ

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून डिवचलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक टीकांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन केले. त्यावरुन भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले.

कोरोना कसा घालवायचा यावर राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी भरगच्च षणमुखानंद सभागृहातून WHOला मार्गदर्शन केलंय म्हणे, असा टोला चित्र वाघ यांनी लगावला आहे.

१० तोंडं काय अन् ३ तोंडं काय.. रावण तो रावण! महिलांवर अत्याचार करणाऱ्या रावणासारख्या अपप्रवृत्तीचं दहन करायलांच हवं. त्यासाठी प्रत्यक्ष प्रभू राम तर अवतरणार नाहीत पण रामरूपी जनताच रावणाची सत्ता उलथवून ख-या अर्थानं सीमोल्लंघन करेल, असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला रावणाची उपमा दिली होती.

दरम्यान,विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यंमत्री काल म्हणाले की महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!