मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात भाजप आणि केंद्र सरकार यांना धारेवर धरले. स्वबळाचा नारा दिला. मराठी माणसाने भेदाभेद विसरावेत पण हिंदुत्वाचीही कास सोडू नये, असा सल्ला आजच्या दसरा मेळाव्यता दिला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जोरदार मांडणी केली. या भाषणावर मात्र, भाजपने टीका केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरेंच्या भाषणावरुन टीका केली आहे.
कालच्या मुख्यमंत्री यांच्या भाषणात केवळ आणि केवळ गुजरात, भाजप, मोदी आणि अमित शहा यांच्या द्वेषाची मळमळ भाषणातून जाहीर झाली. महाराष्ट्रातील पोलिसांचा तुम्हाला अभिमान आहे, कुठल्या वाझेचा का? असा सवाल उपस्थित करत, नवाब मलिक ड्रग्स पेडलरची वकिली करत आहेत त्यांचे समर्थन तुम्ही करत आहात,असा आरोप खातखळकरांची मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार भाषण करत भाजप व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यास प्रत्यूत्तर म्हणून आमदार खातखळकरांची ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ”उद्धव ठाकरे यांचे भाषण हे भाजप द्वेषाची मळमळ होती. त्यापलीकडे राज्यातील जनता, शेतकऱ्यांसाठी शुन्य भाषण आहे,” अशी टीका भातखळकरांनी केली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार भाषण करत भाजप व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यास प्रत्यूत्तर म्हणून आमदार खातखळकरांची ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यांच्या कारभारात केंद्राची लुडबुड नको’, मुख्यमंत्र्यांचे जाहीर आव्हान’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- प्रदीर्घ काळानंतर लवकरच’सकिनाची प्रेमकथा’;सनी देओलने केली घोषणा..!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

