Share

‘राज्यांच्या कारभारात केंद्राची लुडबुड नको’, मुख्यमंत्र्यांचे जाहीर आव्हान’

Published On: 

मुंबई: विजयादशमीनिमित्त काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसैनिकांना संबोधित केले. त्यात त्यांनी केंद्रातील भाजप पक्षाला खडेबोल सुनावले. सुरुवातीला आपल्या भाषणाची सुरवात त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन केली त्यानंतर त्यांनी
राज्यघटनेनुसार देशात संघराज्य व्यवस्था असून केंद्राइतकेच अधिकार राज्यांना आहेत. राज्यांच्या दैनंदिन कारभारात केंद्राची लुडबुड आणि दडपण नसावे ही भूमिका सर्व राज्यांनी घेण्याची वेळ आली आहे. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

यावेळी त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून भाजपमधील उपटसुंभ नवहिंदूंमुळे देशात हिंदुत्वाला धोका असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वाचे तुमचे विचार तुमचीच माणसे ऐकणार नसतील तर काय उपयोग, असा सवालही त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला. तुम्ही म्हणता आपले सर्वाचे पूर्वज एक होते. मग उत्तर प्रदेशातील ज्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते काय, हे सर्व प्रकार तुम्हाला मान्य आहेत काय, असा संतप्त सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

सत्तेचे व्यसन हे अमली पदार्थासारखेच घातक असते, याचा बंदोबस्त कोण करणार? अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे ते व्यसन करणाऱ्या माणसाचे घरदार उद्ध्वस्त होते. पण सत्तेचे व्यसन लागलेल्यांमुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी व्यसन देशातून नष्ट केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!