मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सध्या विविध कारणामुळे चर्चेत आहेत. माध्यमाद्वारे तसेच सोशल मिडियाद्वारे त्या आपले मत परखडपणे मांडत असतात. काल विजयादशमीनिमित्त एक ट्वीट करत चित्रा वाघ यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचार बाबत परखड मत मांडले आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत लिहिले की, ‘१० तोंडं काय अन् ३ तोंडं काय.. रावण तो रावण! महिलांवर अत्याचार करणाऱ्या रावणासारख्या अपप्रवृत्तीचं दहन करायलांच हवं. त्यासाठी प्रत्यक्ष प्रभू राम तर अवतरणार नाहीत पण रामरूपी जनताच रावणाची सत्ता उलथवून ख-या अर्थानं सीमोल्लंघन करेल,’ असे म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
१० तोंडं काय
अन्
३ तोंडं काय.. रावण तो रावण !महिलांवर अत्याचार करणाऱ्या रावणासारख्या अपप्रवृत्तीचं दहन करायला हवं
त्यासाठी प्रत्यक्ष प्रभू राम तर अवतरणार नाहीत पण..
रामरूपी जनताच रावणाची सत्ता उलथवून ख-या अर्थानं सीमोल्लंघन करेलजय श्री राम !@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 15, 2021
दरम्यान, या आधी ११ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने याला कडाडून टीका केली. त्यानंतर आता पुण्यासारख्या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडल्याने चित्रा वाघ यांनी आता महाराष्ट्र बंद कधी करणार? असा प्रश्न करत सरकारवर निशाणा साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिय


