Share

अनिल देशमुखांच्या उचलबांगडीवर जयंत पाटील यांचं मोठं विधान ! म्हणाले…

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.

या बैठकीत शिवसेना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले होते. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सरकारमधील काही नेत्यांची असल्याच्या चर्चा होत्या.

याबाबत आता जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘अशा वावड्या उठवण्याची गरज नाही. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची काहीही चूक नाहीये. त्यामुळे खांदेपालट करण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार कोणालाही पाठीशी घालत नसून दोषींना प्रायश्चित्त झालच पाहिजे’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!