Share

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीनंतर जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

Published On: 

तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चर्चेत आहेत. सिंग हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत सोबतच सिंग यांच्यावर देखील काही मंडळींनी गंभीर आरोप केल्याने त्यांचे नाव विशेष चर्चेत आहे.

सचिन वाझेनंतर परमबीर सिंग यांनी देखील लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील व्यक्तीचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. यानंतर, भाजपने अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मांडला गेला आहे.

भाजपच्या या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. तुळजापूरमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहून वाटेल तसे बेछूट आरोप केले आहेत. जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यासारखा गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप कार्यकारिणी जर एखादा ठराव करत असेल तर भाजप पक्षात वैचारिक दिवाळखोरी आली असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

‘ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप आहेत, ज्याचा तपास एनआयए करत आहे, अशा अधिकाऱ्याने लिहिलेली पत्रं ही दबावापोटी लिहून घेतलेली आहेत की अशीच लिहिलेली आहेत, हे समजण्याइतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही,’ असं देखील जयंत पाटील म्हणाले.

काय आहे हा ठराव ?

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, असा ठराव भाजपने मंजूर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!