🕒 1 min read
Jayant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्याच्या सरकारमध्ये फार रस नाही”, असा टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला आहे.भाजपने तब्बल 9 राज्यातील सरकार पाडली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला भाजप आणि राज्यातील सरकारबाबत अस्था राहीलेली नाही, असंही जयत्न पाटील म्हणालेत.
यावेळी बोलताना त्यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “अब्दुल सत्तार यांचे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबतचे वादग्रस्त विधान, तसेच कालचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे फडणवीसांना मान्य आहेत का? हे त्यांना विचारले पाहीजे, हे त्यांना मान्य असू शकत नाही”,असं मत जयंत पाटलांनी मांडलं.
पुढे ते म्हणाले, वेदांतासाठी आपण गुजरात पेक्षा जास्त सवलती दिल्या होत्या. मात्र, तरी देखील प्रकल्प गेला. दु:ख हे आहे की जवळपास 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. मात्र, प्रकल्प तिकडे गेल्यामुळे आपल्या राज्याला मोठा फटका बसल्याचं जयत्न पाटील यावेळी बोलताना म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- BCCI धोनीवर सोपवू शकते मोठी जबाबदारी, ‘या’ पदासाठी होऊ शकते त्याची नियुक्ती
- Girish Mahajan | “जितेंद्र आव्हाडांचं प्रकरण सूर्याएवढं स्वच्छ”; गिरीश महाजनांची बोचरी टीका
- Raj Thackeray | “खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही…” ; स्मृतिदिनी राज ठाकरेंची पोस्ट
- Jayant Patil | लोकांसमोर सरकारची फसवेगिरी उघडी पाडा – जयंत पाटील
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती टिप्स वापरून चेहऱ्यावरील काळे डाग करा दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
