Share

Girish Mahajan | “जितेंद्र आव्हाडांचं प्रकरण सूर्याएवढं स्वच्छ”; गिरीश महाजनांची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

Girish Mahajan | नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे सेशन कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळाला. जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप करत आव्हाडांविरोधात गुन्हा (Case Regester Against Jitendra Awhad) दाखल केला होता. रिदा रशिद असे या तक्रारदार महिलेचे नाव आहे. आव्हाडांच्या जामीनानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांचे प्रकरण सुर्या एवढ स्वच्छ आहे.” आव्हाडांनी आधीच्या लोकांना केलेली मारहान हे काय आहे?, आणि त्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला?, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला. लोकांनी पाहीले आहे की, तुम्ही महिलेला दोन्ही हात धरुन कसं ढकलला आहे ते. त्यामुळे आव्हाडांवरील कारवाई ही नियमानुसार झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर गिरीश महाजनांनी भाष्य केलं. “आधीच्या महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात नारायण राणे, मला, राणा दांपत्य, कंगणा राणावत यांच्यावर केलेली कारवाई ही सुडबुद्धीने झालेली नाही का?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना महाजनांनी एकनाथ खडसेंवरही टीका केलीय. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सर्व पदे घरात पाहीजे. त्यांचे संपुर्ण कुटुंब तूप आणि लोणी खात असल्याचं म्हणत त्यांनी खडसेंवर हल्लाबोल केलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!