🕒 1 min read
Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांनी या बैठकीला संबोधित केले. त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
प्रसार माध्यमे आपली भूमिका लावून धरतील अशी अपेक्षा ठेवू नका. मात्र समाज माध्यमावर आपल्या या उपक्रमाची जोरदार प्रसिद्धी करा. हे सरकार कशाप्रकारे सत्तेत आले आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा प्रचार करून लोकांसमोर यांची फसवेगिरी उघडी पाडावी, असे जयंत पाटील म्हणाले.
आपला पक्ष हा सर्वात जास्त चर्चेत असलेला पक्ष आहे. भाजपला खात्री आहे हा पक्ष राज्यात काहीही करू शकतो. त्यामुळे आपल्यावर प्रहार केला जात आहे. येत्या काळात आपल्यावर अनेक अधिक प्रहार होतील, आपण मात्र घाबरून जायचं नाही. लढा देणे, संघर्ष करणे हे आपले कर्तव्य आहे. २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा इतिहास घडवेल, अशा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
नुसते हायवे झाले म्हणजे विकास झाला असे या सरकारला वाटते. महागाई, रोजगार हा विषय सरकारला महत्त्वाचा वाटत नाही. यासाठी भगिनींनी पुढे यायला हवे. या सरकारविरोधात आवाज उठायला हवा. जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात हा उपक्रम यशस्वी करायला हवा, असे आवाहन जयंत पाटलांनी केले.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष आम्ही रक्ताचं पाणी करून इथपर्यंत आणला आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. एखादी महिला पक्ष सोडत असेल तर त्यांची विचारपूस करा, त्यांचं मत बदला, प्रत्येकाचा मान राखा, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती टिप्स वापरून चेहऱ्यावरील काळे डाग करा दूर
- Bawankule on Ajit Pawar | “…तर तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही” ; बावनकुळे अजित पवारांना असे का म्हणाले?
- Jitendra Awhad | जामीनानंतर आव्हाडांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सगळं ठरलेलं…”
- Health Tips | लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Shivsena | मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
