मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी आणि गाडा मालक बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. ही बातमी आपल्या सर्वांसाठी मोठी आनंदाची आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. शर्यत सुरू व्हावी ही पुणे भागातील आणि राज्यभरातील शेतकरी बांधवांची भावना होती. या भावनांचा मान राखत महाविकास आघाडीने सातत्याने पाठपुरावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरला असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/1089395705143503/
दरम्यान, राज्य सरकारमार्फत तज्ज्ञ वकीलांची टीम लावली आणि आज हा आनंदाचा दिवस उजाडला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.खिलारसारख्या इतर प्रजातींचं संवर्धन व्हावं यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीदेखील जयंत पाटलांनी दिली आहे. ‘पुनश्च बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…’, अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आनंद
- धक्कादायक! सोनू सूदनं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या महिला नेमबाज खेळाडूची आत्महत्या
- राजकीय बॅनरबाजीतून औरंगाबादचे विद्रुपीकरण; औरंगाबाद मनपाची थातूरमातूर कारवाई..!
- डेटा करण्यासाठी लागणारा निधी त्वरित देणार- अजित पवार
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले यश


