टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाला. या निमित्त अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना समाज मध्यमांवरून शुभेच्छा दिल्या.
तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नरेंद्र पाटील यांनी दोन्ही नेत्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. चक्क एका बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो लावून दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बॅनरवर वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित होतेच पण इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देखील एकाच बॅनरवर दिसून आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही फोटो या बॅनरवर आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

