🕒 1 min read
सांगली – देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआय लावली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रसरकारवर केला आहे.
देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. अनिल देशमुख यांच्या मागे लागण्यापेक्षा हा वेळ जर कोविडला भारतातून बाहेर काढण्यासाठी दिला असता तर चांगली परिस्थिती देशात राहिली असती अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेली एफआयआर ही अंत्यत भोंगळ स्वरूपाची आणि मर्यादेचा भंग करून जे सांगितले नाही त्या विषयाला स्पर्श करणारी ही एफआयआर आहे. सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे.सीबीआयचा राजकीय वापर होतोय असेही जयंत पाटील म्हणाले.
देशात मोघलाई लागलीय असे वाटावे असा हा आज अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईच्या प्रकारावरून वाटते. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल, त्यामुळे एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठीच आधी एफआयआर दाखल केली मग छापेमारी सत्र सुरू केले असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून कडा या गावात वापरली ‘ही’ पद्धत
- तांदुळाचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, २३ क्विंटल तांदूळ जप्त
- अभिनेत्री हिना खानच्या वडिलांच्या निधनानंतर गौहर खान झाली ‘या’ कारणासाठी ट्रोल
- CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर जयश्री पाटील आक्रमक, देशमुखांना अटक करण्याची केली मागणी
- ‘सर्वांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
