पुणे – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.तर पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयंत दिनकर आसगावकर विजयी झाले.
आसगावकर यांना 25 हजार 985 मते मिळाली. 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळेआसगावकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत होते.
महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींचा नागपूरकरांनी केला दारुण पराभव
- आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
