🕒 1 min read
औरंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी (दि.७) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. अरुंद पुलामुळे जय भवानी नगरमधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. विशेषतः यात एक १८ वर्षीय तरुण नाल्यात बुडता बुडता वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त वातावरण तयार झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात जय भवानी नगर मधील समस्या कायम आहेत. मात्र मनपा प्रशासनाने यास पूर्णतः नकार देत असे काहीच घडले नसल्याचा दावा केला आहे.
जयभवानीनगरातील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणाचा विषय गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. मोठा पाऊस होताच अनेक गल्ल्यांमध्ये पाणी तुंबून ते घरात शिरते. त्यामुळे जीवनावश्यक साहित्य वाचविण्यासाठी नागरिकांना तारांबळ करावी लागते. दोन वर्षांपूर्वी तुंबलेल्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, आमदार, खासदारांनी पाहणी केली. अतिक्रमणे तोडण्याचे आदेश झाले.
मात्र अद्याप येथील प्रश्न मार्गी लागलेला नाही. अजूनही ते अतिक्रमणे काढण्यात आलेली नाहीत. सध्या याठिकाणी १२०० मिमीचे दोन पाईपलाईन टाकण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा सहजरित्या होत असल्याचे मनपा अभियंता आर. एन. संधा यांनी सांगितले. मात्र मुळात नाल्याची रुंदी कमी असल्याने तसेच एमजीएमकडून पाण्याचा येणारा प्रवाह जास्त असल्याने याठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत.
पूलाचे काम अर्धवट सोडले : माजी नगरसेवक बालाजी मुंडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले, जय भवानी नगरमधील गल्ली नंबर सहा सातमध्ये पूल बांधण्याच्या कामाचे टेंडर तीन वर्षांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र हे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळेच जय भवानी नगरमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अंतर्गत गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र येथील काम मनपा प्रशासनाने अर्धवट सोडले आहे. यासाठी बजेट नसल्याची ओरड प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
पावसाळ्यातच मनपाला जाग येते: मुख्य जय भवानी चौकात जो नाला आहे त्याठिकाणी मनपाने सर्वप्रथम साफसफाई करायला हवी होती मात्र तेथून पुढे साफसफाईची कामे झाली. मात्र सुरुवातीलाच साफसफाई न झाल्याने काल याठिकाणी एक तरुण बुडता बुडता राहिला. त्यामुळे याठिकाणी नाला रुंदीकरण करणे अतिआवश्यक आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यातच मनपाला जाग येत असल्याची प्रतिक्रीया नागरिक राहुल इंगोले यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राऊतांचं नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता?’, चंद्रकांत पाटलांचा टोला
- राज्यात सगळ्या निवडणुका पार पडत असतील तर आषाढी वारीला काय अडचण आहे ?
- फोटो सेशन झाले, पण पीक विम्याचे काय? आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा सरकारला सवाल
- काळ आला होता पण वेळ आली नव्हती…’तो’ बुडता-बुडता बालंबाल बचावला
- ‘अस्वस्थता नाही, पण आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे’, खडसेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
