Share

जसप्रीत बुमराहला आयसीसीने पाठवलं ‘हे’ खास गिफ्ट, सोशल मीडियावर शेअर केले फोटो; पाहा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील या मालिकेचा भाग नाही. बुमराहने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. बुमराहने लाल रंगाची कॅप हातात धरलेली या फोटोत दिसत आहे. ही कॅप दशकातील आयसीसी (ICC) टी-२० इंटरनेशनल टीम ऑफ द डिकेड ची आहे. २०२० मध्ये आयसीसीने सर्व फॉरमॅटसाठी दशकातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली होती. तेव्हा भारतीय संघातील चार खेळाडूंना आयसीसीच्या टी-२० संघामध्ये स्थान मिळाले होते.

बुमराह म्हणाला की, ‘२०२० मध्ये आयसीसीने सर्व फॉरमॅटमधील प्लेयर ऑफ द डिकेडची घोषणा केली होती. यामध्ये भारतीय संघातील चार खेळाडूंना आयसीसीच्या टी-२० संघामध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश होता. धोनीला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या घोषणेनंतर तब्बल १८ महिन्यांनंतर आयसीसीने बुमराहला ही कॅप पाठवली आहे.’ या कॅपचे फोटो शेअर करताना बुमराहने लिहिले- ‘या सन्मानासाठी आयसीसीचे आभार.’

https://www.instagram.com/p/Celkck7qOsP/?igshid=YmMyMTA2M2Y=

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बुमराहची कामगिरी
जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले होते. त्याची टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. बुमराहने ५७ सामन्यांच्या ५६ डावांमध्ये १९.८९ च्या सरासरीने आणि ६.५० च्या इकॉनॉमीने ६७ बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराहने फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. मात्र आयपीएल २०२२ मध्ये तो काही विशेष करू शकला नाही. बुमराहने यंदाच्या १४ सामन्यात २५.५३ च्या सरासरीने आणि ७.१८ च्या इकॉनॉमीने १५ बळी घेतले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!