Share

जसप्रीत बुमराहचं मुंबई इंडियन्सकडून अनोखं ‘शतक’; टीमनं दिलं  खास गिफ्ट 

Published On: 

🕒 1 min read

दुबई : टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज जसप्रीत बुमराहने रविवारी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या लीगच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मैदानात उतरताच एक विशेष कामगिरी केली आहे.

बुमराह मुंबई इंडियन्सकडून 100 सामने खेळणारा सहावा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी किरॉन पोलार्ड (192 *), रोहित शर्मा (169), हरभजन सिंग (158), लसिथ मलिंगा (139) आणि अंबाती रायडू (136) सामने खेळले आहेत. रविवारी या यादीत बुमराहचे नावही जोडले गेले आहे.

बुमराह आयपीएलमध्ये 100 सामने खेळणारा 45 वा खेळाडू आहे. त्याने आपले सर्व सामने मुंबई इंडियन्ससाठी खेळले आहेत. तो गेल्या आठ हंगामांपासून मुंबई इंडियन्ससोबत आहे आणि संघाच्या यशात त्याचा मोलाचा वाटा आहे. बुमराहच्या पदार्पणापासून मुंबईने आयपीएलमध्ये पाच जेतेपदे जिंकली आहेत.

आयपीएलमधला खास विक्रम ठरला 

रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी आयपीएलमध्ये खेळलेल्या 99 सामन्यांमध्ये बुमराहने 7.39 आणि 24.14 च्या सरासरीने 115 विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी 14 धावांत 4 होती.

रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने बुमराहला 100 क्रमांकाची विशेष जर्सी सादर केली. ही जर्सी त्याला झहीर खानने स्वतःच्या हातांनी दिली होती. सर्व खेळाडूंनी त्याला हा टप्पा गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!