Share

३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार-राकेश टिकैत

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे आज ३१ जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. असे भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेले तीन कृषि कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक वर्षभर आंदोलन करावे लागले. त्यानंतर ते कायदे मागे घेण्यात आले. मात्र दिलेले वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे आजचा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे.

 

राकेश टिकैत यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. टिकैत म्हणतात, ‘ केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास घात केल्याने आजचा ३१ जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे. केंद्र सरकारने ९ जानेवारी रोजी दिलेल्या पत्रावरुन आंदोलन स्थगित करण्यात आले होते, त्यातील एकही वचन सरकारने पूर्ण केले नाही.’, असे ट्विट राकेश टिकैत यांनी केले आहे.

भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केले होते. हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी २०२० मधील नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले होते. यात तीन कृषी कायदे मागे घेण्यासह शेतमालाला एमएसपी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने एमएसपी लागू करण्याचे वचन दिले होते. मात्र पूर्ण केले नाही, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!