पुणे : दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी भोसरी येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी ) येथे भेट दिली. त्यावेळी बोलत होते. या ठिकाणी परब यांनी एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत एसटीच्या उत्पन्न वाढीसंदर्भातील विविध पर्यायावर चर्चा केली.
यावेळी ते बोलताना म्हणाले कि, एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही. एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी शासनाने एसटीला ६०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे वेतनासारख्या अत्यावश्यक गोष्टीना आता अडचण येणार नाही, एसटी महामंडळाला कोरोनाच्या महामारीत आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, काही गाड्यांच्या फेऱ्यांचे एकत्रीकरण करणे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत, एसटीचे खासगीकरण करण्यात येणार नाही.’ असा थेट सुतोवाच त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मात्र घोषणा झाल्यानंतर अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ६०० कोटी रुपयांमधून पहिला हफ्ता पुढील आठवड्यात एसटी महामंडळाला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आठवड्याच्या सुरवातीला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांमुळे ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी निधी मंजूर’, धनंजय मुंडेंची माहिती
- पवारांच्या लेकीची ‘पॉवर’बाज कामगिरी! लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळे अव्वल
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- ‘शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- ‘परिचारिकांवर कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज केला?’, अजित पवारांनी दुर्लक्ष केल्याने भाजप आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

