Share

‘कोरोना रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही याची काळजी घेणार’, अजित पवारांची ग्वाही

Published On: 

उस्मानाबाद : राज्यात करोनाचं थैमान सुरू असताना सगळ्यांनीच डॉक्टरांना करोना योद्ध्यांचा मान दिला आहे. मात्र, अजूनही काही रुग्णालयांकडून रुग्णांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत. असे प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील घडले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

प्रत्येक दवाखान्यात ऑडिटर नेमले जातील. रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. जिथं संसर्ग वाढत आहे तिथं चाचण्या वाढवल्या जात आहेत. सध्या ज्या जिल्ह्यात कोरोनाची जास्त बाधा आहे तिथं पाहणी करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि खरीप हंगामाचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनासंबंधी ज्या सेवा सध्या दिल्या जात आहेत त्याला लागणारी वीज असेल किंवा इतर सर्व अडचणी येणार नाहीत. यामध्ये रस्त्यांची सोय, पाण्याची अडचणी असतील तर त्या लवकर सोडवल्या जातील. तसेच राज्यात सध्या ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासन संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

गार्ड ऑफ ऑनर नाकारला
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे येत असल्यामुळे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तयारी केली होती. मात्र, अजित पवार आण राजेश टोपे दाखल झाले त्यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. अशावेळी पोलीस कर्मचारी गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पुढे सरसावले. पण पावसात भिजणाऱ्या पोलिसांना पाहून अजित पवारांनी गार्ड ऑफ ऑनर नाकारला. तसेच पावसात भिजू नका असं पोलिसांना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!