Share

ईशान नव्हे तर याच्या सोबत कॉलिफोर्नियामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे जान्हवी कपूर

Published On: 

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरचा नुकताच ‘रुही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहे. बॉलीवूडमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर जान्हवी कपुर आता टॉलीवूडमध्येही  पदार्पण करण्यास सज्ज आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. रुही हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने पहिल्यांदाच डबल रोल साकारला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जान्हवी कॉलिफोर्नियामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.

मात्र, या ट्रीपला ती एकटी गेली नसून दोन खास व्यक्ती तिच्यासोबत मजा करताना दिसतायेत. जान्हवीने या ट्रीपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण हे फोटो पाहून जान्हवीसोबत असणारा मुलगा कोण आहे असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. हा मुलगा रोहन जौरा असून अनेक फोटोंमध्ये आपल्याला तो दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CM1S_mplxmn/?utm_source=ig_web_copy_link

जान्हवी कपूरने धडक या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिने नुकतेच ‘गुड लक जेरी’चे पहिले शेड्युल पूर्ण केले आहे. हा साऊथ स्टार नयनतारा अभिनित तमिळ चित्रपटाचा कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!