🕒 1 min read
मुंबई : अखेर ‘बिग बॉस 14’च्या घरातून बेघर झाला आहे जान कुमार सानू. ‘वीकेंड का वार’च्या एलिमिनेशन प्रक्रियेत जान कुमार सानूचे नाव आल्याने त्याला घरातून बेघर व्हावे लागले. यावेळी घरात निर्माती एकता कपूर मोठे धमाके घेऊन आली होती. टीव्ही क्वीन एकता कपूरने ‘बिग बॉस 14’च्या घरात स्पर्धकांची परीक्षा घेतली. एकता कपूरच्या या परीक्षेत केवळ निक्की तंबोली आणि रुबीना दिलैक या दोघीच उत्तीर्ण झाल्या आहेत
एकता कपूरने घरातील स्पर्धकांना एकमेकांच्या ‘एक्झिट’ तारखा ठरवण्यास सांगितल्या होत्या. यावेळी जान कुमार सानू आणि कविता कौशिक खेळाच्या 7व्या आठवड्यात घराबाहेर पडतील, असा अंदाज बहुमताने बांधण्यात आला होता.
मध्यंतरी जानच्या वादग्रस्त वक्तव्यमुळे तो चर्चेत आला होता ‘बिग बॉस’ मध्ये चालू असलेल्या खेळादरम्यान निक्की जान सानू सोबत मराठी मध्ये सवांद साधत होती. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.
यावरच मनसेने आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. आणि जान सानू ला या ‘शो’ मधून काढून टाकण्यास देखील सांगितले. जान सानूच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार आक्रोश पाहायला मिळाला होता.
या वादानंतर कलर्स टीव्ही ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून माफी मागितली. “कलर्स टीव्हीवर मंगळवारी, 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या बिग बॉसच्या एपिसोडमधील मराठी भाषेवरील टिप्पणीसाठी आम्ही माफी मागतो. महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.” – कलर्स टीव्ही. नंतर ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा विद्यार्थ्यांनो EWS आरक्षण घेतल्यास SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’
- ‘ही’ अट मान्य असेल तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
- पदवीधर व शिक्षक निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार पडणार – प्रवीण दरेकर
- मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही : मनसे
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
