Share

जम्मू-काश्मीर कलम ३७० रद्द करण्यापूर्वीच चांगले होते – आझाद

Published On: 

🕒 1 min read

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीर मधील विशेष कलम ३७० रद्द केला आणि राज्याला जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. यावेळी मोदी सरकारने विविध मुद्द्यावर आश्वासनं दिले होते. परंतु यातील एक सुद्धा पूर्ण झाले नाहीत असे देशातील अनेक नेते मोदी सरकार वर टीका करताना दिसून येत आहेत.

यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सुद्धा मोदी सरकारवर या संदर्भात निशाना साधला. ते या वेळी म्हणाले जम्मू-काश्मीर कलम ३७० रद्द करण्यापूर्वी बरेच चांगले होते ,केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये बरेच बदल घडवून आणण्याची आश्वासने दिली होती. मात्र त्यापैकी काहीच घडलेले नाही असं मत आझाद यांनी मांडले.

दरम्यान ३७० कलम रद्द केल्यानंतर अनेक बदल होतील असे आम्हाला सांगितले होते. परंतु प्रदेशात हॉस्पिटल आणि इतर पायाभूत सुविधा तसेच रोजगार निर्मिती केली जाईल पण यामधील काहीच झाले नाही. जेव्हा तिथं मुख्यमंत्र्यांचे शासन होते तेव्हा आमची परिस्थिती बरीच चांगली होती. जम्मू -काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याचे परिणाम लोकांना जाणवत आहेत. ‘आम्ही हरलोय. एका राज्याचे दोन भाग झाल्याने आमचं खूप मोठं नुकसान झालंय. राज्यातील विधानसभा बरखास्त झाल्यापासून आमचा मोठा पराभव झाला आहे’ अशी खंत गुलाम नबी आझाद यांनी माध्यमासोबत बोलताना व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!