Share

आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर ‘भाजप’चा झेंडा फडकवणार; कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक पातळीवर गावाचा विकास करायचा असेल तर भाजपला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ बूथ अभियानाअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील अंधारी, घाटनांद्रा, उंडणगाव, अजिंठा, शिवना जिल्हापरिषद गटातील बूथ रचना, शक्तिप्रमुख, बुथप्रमुख, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांना संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन करून आढावा घेण्यात आला.

जर गावातील स्थानिक विकासकामांना चालना द्यायची असेल तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण ताकदीने विजय मिळवू असा निर्धार जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. जिल्ह्यातील ६२ जिल्हा परिषद सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम अंत्यत जोमाने चालू आहे. जिल्हा परिषदेतील एका सदस्यामुळे भाजपाच्या ताब्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पद आले नाही.

याच कारणामुळे सिल्लोड -सोयगाव तालुक्यात विकास कामांच्या निधींना मुकावे लागले. त्यामुळे आवश्यक असलेली विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे प्रत्येक सदस्य पूर्ण ताकदीने निवडून आणा असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!