Share

क्या बात है…. सोलापुरात 18 तासात बांधला 25 किमीचा रस्ता, गडकरींनीही केले तोंडभरून कौतुक

Published On: 

सोलापूर- केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी हे आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी ओलाक्ष्ले जातात. गडकरी यांच्या कामाचं नेहमीच कौतुक करण्यात येते. गडकरी यांनी देशातील रस्त्यांच्या कामातून स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता आणखी एका बातमीमुळे त्यांचे कौतुक करावेच लागणार आहे.

सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका 25 किमी रस्त्याचं काम अवघ्या 18 तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

कंत्राटदार कंपन्यांच्या पाचशे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने हे कार्य प्रगतीपथावर आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, अधिकारी, कंत्राटदार कंपनी आणि सर्व कामगारांचे अभिनंदन केले. सोलापूर-विजापूर राजमार्ग ११० किमीचे काम प्रगतीपथावर आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

सोलापूर आणि विजापूर चौपदरीकरणादरम्यान येथे बायपास रस्ते काढण्यात येणार आहेत. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूल सुद्धा असणार आहे.सोलापूर-विजापूर हा महामार्ग पूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जायचा तसेच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडला जाणारा रस्ता एनएच ५२ नावाने ओळखला जायचा.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!