Share

जालनावासियांची होणार खड्ड्यांतून मुक्तता, रस्त्यांसाठी ५ कोटी ५५ लाखांचा निधी मंजूर

Published On: 

🕒 1 min read

जालना: राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सोमवारी जालना शहरातील प्रमुख तीन सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी ५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी मिळाला असून यातून प्रमुख रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असे राज्य विधिमंडळ आश्‍वासन समितीचे प्रमुख आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

या तीन प्रमुख रस्त्यांच्या कामासंदर्भातील निविदा प्रक्रिया जालना नगरपालिका प्रशासनाकडून तातडीने पूर्ण करण्यात येईल व उपरोक्त रस्त्यांची कामे लवकरच सुरू करून जालनेकरांची रस्त्यांची समस्या सोडवण्याची ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, आपण राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

रस्त्यांच्या कामासाठी केलेली मागणी गांभीर्याने घेत नगरविकास विभागाने मागील कालावधीत जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गुरुबच्चन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक आणि मस्तगड ते रेल्वेस्टेशन या प्रमुख तीन रस्त्यांच्या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी जालना नगरपालिकेला उपलब्ध करून दिला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामांना सुरुवात होईल. सोमवारी मिळालेल्या ५ कोटी ५५ लाखांच्या निधीतूनही दर्जेदार कामे केली जाणार आहेत, असे आ. गोरंट्याल यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!