🕒 1 min read
मुंबई : टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारतीय संघासमोर 14 वर्षांचा दुष्काळ संपविण्याचे आव्हान आहे. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताने अखेर इंग्लंडच्या भूमीवर एक कसोटी मालिका जिंकली होती.
टीम इंडियाच्या इंग्लंड दौर्यापूर्वी माजी कर्णधार राहुल द्रविडने असा अंदाज वर्तविला आहे. ते म्हणाले की, इंग्लंड दौर्यावरील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 3-2 ने विजय मिळवेल 2007 नंतर युकेमध्ये जिंकण्याची ही संघासाठी सर्वोत्तम संधी असल्याचे द्रविड म्हणाला.
एका मुलाखतीत बोलताना द्रविड म्हणाला, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय नोंदविल्यानांतर भारत खूप चांगली तयारी करेल. ऑस्ट्रेलियामध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात आहे. यापूर्वी काही खेळाडू इंग्लंडमध्ये खेळले आहेत. यावेळी आमची फलंदाजी खूप अनुभवी आहे. तर कदाचित ही आमच्यासाठी सर्वात चांगली संधी आहे. भारत ही मालिका 3-2 ने जिंकू शकतो.
दरम्यान, राहुल द्रविडने इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरीसाठी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय. विराट कोहलीला प्लेइंग इलेव्हन निवडताना याचा निश्चितच फायदा होईल. भारतीय संघाला इंग्लंडमध्ये धमाकेदार कामगिरी करायची असेल तर अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडगोळीला एकत्रितपणे प्लेइंग इलेव्हनध्ये खेळवायला पाहिजे, असे राहुल द्रविडने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या,आता ईडीनेही दाखल केला गुन्हा
- ‘सोलापूरचे पाणी पळवणारे भरणे हे चोर आहेत आणि अजित पवार हे दरोडेखोर आहेत’
- ‘भाजपची भाषा रामराज्याची होती परंतु आता उत्तरप्रदेश-बिहार रामभरोसे सोडले’
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- ‘आंदोलन दडपण्यासाठीच भरणे यांनी इंदापूरचे शेतकरी व शिवसैनिकांना बोलावले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

